नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० जानेवारीला सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अजेंडा समोर ठेवणार असल्याची माहिती संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राजकीय पक्षांची ३० जानेवारीला ऑनलाईन बैठक घेणार आहेत. त्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची प्रक्रिया आहे. मात्र, यंदा ही बैठक संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-केंद्रीयर्थसंकल्प २०२१: प्राप्तिकरात दिलासा मिळावा, स्टार्टअपची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ३० जानेवारीला सर्व पक्षांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंजेडा समोर ठेवणार आहे. तसेच विरोधकांच्या सूचना सरकार ऐकणार असल्याचे संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.