नवी दिल्ली- केंद्र सरकार ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेमध्ये मांडला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखेचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाची संसदीय कामकाज समिती (सीसीपीए) घेणार आहे. सीसीपीएचे अध्यक्ष केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे लवकरच बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत आगामी अधिवेशनाच्या तारखेची शिफारस करण्यात येणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार; अनुराग ठाकूर यांचे संकेत
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभा एकत्रित बोलाविण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. याच दिवशी आर्थिक सर्व्हे संसदेत मांडला जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. हे अधिवेशन एप्रिलपर्यंत चालेल, असेही सूत्राने सांगितले.
संबंधित बातमी वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला तर आर्थिक सर्व्हे ३१ जानेवारीला सादर होण्याची शक्यता