नवी दिल्ली - अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी वित्त मंत्रालयाने ट्विट करत एका कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे. वित्त मंत्रालयाच्या छपाई विभागाचे उपव्यवस्थापक असलेल्या कुलदीप शर्मा यांच्या वडिलांचे २६ जानेवारीला निधन झाले. त्यांच्यावर अर्थसंकल्पासाठी जबाबदारी देण्यात आली होती. अशा स्थितीत कुलदीप यांनी कर्तव्याला प्राधान्य देत छपाई परिसर न सोडण्याचा निर्णय घेतला.
वित्त मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे, की कुलदीप यांच्याजवळ अर्थसंकल्प तयार करण्याचा ३१ वर्षांचा अनुभव आहे. निर्धारित वेळेत अर्थसंकल्प छपाई करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात.