महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अर्थसंकल्प २०२० : व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून गोंधळ - Budget speculation

यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्य माणसांना अधिक दिलासा मिळावा, अशी कर तज्ज्ञांना अपेक्षा आहे. प्राप्तिकरात सवलत देण्यासाठी आणि वगळण्यासाठी कराच्या वर्गवारीत कमी संधी आहेत. सरकारने बचत खात्यावरील रकमेतून मिळणाऱ्या व्याजावर आणि मुदत ठेवीवरील व्याजावर अधिक सवलत द्यायला पाहिजे, असे दिल्लीतील प्राप्तिकर तज्ज्ञ के. के. मित्तल यांनी सांगितले.

Tax relief
प्राप्तिकर कपात

By

Published : Jan 25, 2020, 1:01 PM IST

हैदराबाद- येत्या काही दिवसात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. अशा स्थितीत व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अधिक सवलत देण्यावरून मोठा गोंधळ दिसत आहे.


गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्राप्तिकरदात्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्राप्तिकराच्या ८० जी करात सुधारणा करण्यात आली होती. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखापर्यंत आहे, त्यांना करामधून पूर्ण वगळले होते. हा निर्णय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात सामान्य माणसांना अधिक दिलासा मिळावा, अशी कर तज्ज्ञांना अपेक्षा आहे. प्राप्तिकरात सवलत देण्यासाठी आणि वगळण्यासाठी कराच्या वर्गवारीत कमी संधी आहेत. सरकारने बचत खात्यावरील रकमेतून मिळणाऱ्या व्याजावर आणि मुदत ठेवीवरील व्याजावर अधिक सवलत द्यायला पाहिजे, असे दिल्लीतील प्राप्तिकरतज्ज्ञ के. के. मित्तल यांनी सांगितले.

सध्या बचतीसह ठेवीवरील मिळणाऱ्या ५० हजार रुपयापर्यंतच्या व्याजावर ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यात येते. तर सामान्य नागरिकांना केवळ १० हजार रुपयापर्यंत देण्यात येते. ही कर सवलत प्राप्तिकर कायदा १९६१ च्या ८० टीटीएच्या कलमान्वये देण्यात येते. मात्र, ही सवलत केवळ बचत खात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर देण्यात येते. मुदत ठेवीवर अशी प्राप्तिकर सवलत देण्यात येत नाही. सर्व वयोगटातील नागरिकांना ५० हजार रुपयापर्यंतच्या व्याजाच्या रकमेवर प्राप्तिकर लागू करू नये, असे के. के. मित्तल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर


तसेच मुदत ठेवी आणि बचत खात्याची ठेव यामधील फरक सरकारने काढून टाकावा, अशी त्यांनी शिफारस केली आहे. व्याजाच्या मिळणाऱ्या रकमेला प्राप्तिकरात सवलत देण्यासाठी ठोस कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. उदा. मुदत ठेवीवरील व्याज दर हा महागाई दरापेक्षा कमी आहे.

हेही वाचा-भारताचा मंदावलेला विकासदर तात्पुरता - आएमएफ प्रमुख

बहुतांश प्रकरणामध्ये मुदत ठेवीवरील वार्षिक व्याजदर हा ६ ते ७ टक्के आहे. तर किरकोळ बाजारपेठेतील महागाई त्यापेक्षा (वार्षिक व्याजदर) जास्त झाली आहे. त्यामुळे मुदत ठेवी आणि बचत खात्यावरील रकमेवतून उत्पन्न मिळत नसल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

सरकारी आकडेवारीप्रमाणे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये किरकोळ बाजारातील महागाईचा दर हा ७.३५ टक्के राहिला आहे. हा महागाईचा दर जूलै २०१४ नंतर सर्वाधिक राहिला आहे.
(हा लेख वरिष्ठ पत्रकार कृष्णानंद त्रिपाठी यांनी लिहिलेला आहे.)

ABOUT THE AUTHOR

...view details