महाराष्ट्र

maharashtra

१.१३ लाख कोटी रुपयांचे बँकांमध्ये घोटाळे; सहा महिन्यातच उच्चांक

By

Published : Dec 28, 2019, 2:32 PM IST

चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यातच ४ हजार ४१२ घोटाळ्यांचे प्रकरणे समोर आली आहेत. यामधील फसवणुकीचे सर्व प्रकरणे ही १ लाख रुपयांपासून पुढील आहेत.

Representative - frauds
प्रतिकात्मक- बँक घोटाळे

मुंबई - बँकांतील घोटाळ्यांची संख्या चालू वर्षात विक्रमी झाली आहे. चालू वर्षाच्या सहा महिन्यातच बँकांमध्ये १.१३ लाख कोटी रुपयांचे घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयच्या अहवालामधून समोर आली आहे.

चालू वर्षात पहिल्या सहा महिन्यातच ४ हजार ४१२ घोटाळ्यांचे प्रकरणे समोर आली आहेत. यामधील फसवणुकीचे सर्व प्रकरणे ही १ लाख रुपयांपासून पुढील आहेत. आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ६ हजार ८०१ घोटाळ्यांची नोंद झाली. त्यामधून सुमारे ७१ हजार ५४३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. आर्थिक वर्ष २००१ ते २०१७ दरम्यान झालेल्या घोटाळ्यांचे २०१८-१९ मधील अहवालात ९०.६ टक्के प्रमाण आहे. चालू वर्षात नोंद झालेले ९७.३ टक्के बँक घोटाळे हे गेल्या वर्षी घडले आहेत.

हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्पात प्राप्तिकरदात्यांना दिलासा मिळणार; अनुराग ठाकूर यांचे संकेत

असे आहे चालू वर्षातील बँक घोटाळ्यांचे प्रमाण-
५० कोटी रुपयांहून अधिक रकमेचे ३९८ घोटाळ्यांमधून १.०५ लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. तर १ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या घोटाळ्याची २१ प्रकरणे आहेत. त्यामधून ४४ हजार ९५१ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

हेही वाचा-स्टेट बँकेचे एटीएम कार्ड अधिक सुरक्षित; 'हा' केला नवा बदल

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी उद्योगांसह बँकांनी प्रशासकीय कारभारात सुधारणा करावी, असा शुक्रवारी सल्ला दिला. चालू वर्षात पंजाब महाराष्ट्र को ओपरेटिव्ह बँकेतील साडेचार हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीला आला आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details