एखाद्या कापसाच्या ढिगाऱ्यावर आगीची ठिणगी पडावी तशी कोरोना विषाणू मूक विनाश करत मानवजातीचे आयुष्य आणि उपजीविकेला विळखा घालत आहे. जगभरात कोविडची सुमारे 16 लाख प्रकरणे आढळून आली असून जवळजवळ 1 लाख मृत्यू झाले आहेत. यात भर म्हणजे, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्याचे दिसत आहे. तीन महिने मागे जाण्याच्या अपेक्षांची उलथापालथ झाली आहे आणि 170 देशांमधील दरडोई उत्पन्न कमी होत आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) स्पष्ट केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जगातील 81 टक्के (330 अब्ज) मनुष्यबळास उपजीविका उपलब्ध करुन देणारे उद्योग अंशतः किंवा पुर्णपणे बंद झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इशारा दिला आहे की, जर कोरोनाची परिस्थिती दीर्घकाळ टिकून राहिली, तर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी परिस्थिती होईल. कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असेल, तोपर्यंत जगातील अर्धी लोकसंख्या दारिद्र्यरेषेच्या खाली गेलेली असेल, असा अंदाज ऑक्सफाम या आंतरराष्ट्रीय संस्थेने व्यक्त केला आहे.
उद्योग बंद पडले असून रोजगाराच्या संधी कमी झाल्याने केवळ अमेरिकेतील 7 कोटी बेरोजगार लोकांचे लक्ष बेरोजगारी लाभांकडे लागले आहे - येऊ घातलेल्या भयावह मंदीची ही नांदी आहे. त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1930 मध्ये आलेल्या ग्रेट डिप्रेशनच्या आपत्तीची दिलेली पुर्वसूचना अधिक धोकादायक आहे!
50 लाख लोकांचा बळी घेणारा स्पॅनिश फ्लू!
पहिल्या महायुद्धाची अखेर जवळ आली तेव्हा, स्पॅनिश फ्लू आपत्तीने 50 लाख लोकांचा बळी गेला आणि मानवी शोकांतिका घडविली. त्यानंतर 10 वर्षांनी आले ग्रेट डिप्रेशनने अनेक देशांना आर्थिकदृष्ट्या अस्थिर करुन सोडले. त्यावेळी अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला होता. आता कोरोना विषाणूच्या हल्ल्यामुळे सर्व खंडांमधील लोकांचे प्राण आणि आर्थिक स्थैर्यापुढे मोठे आव्हान निर्माण करीत आहे. प्रसाराच्या भीतीने शंभर देशांनी आधीच आपल्या सीमा बंद करुन टाकल्या आहेत. आयात आणि निर्यातीवर अवलंबून असणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कोसळण्याने सर्वाधिक नुकसान हे विकसनशील देशांचे होणार आहे.