नवी दिल्ली - केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक व्याज ८.६५ टक्के देण्याबाबतची लवकरच अधिसूचना काढण्यात येणार आहे. हे व्याज आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी लागू असणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली. ते फिक्की येथील खासगी सुरक्षा रक्षकांच्या परिषदेत माध्यमांशी बोलत होते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी देण्यात येणाऱ्या व्याजासाठी केंद्रीय वित्तीय मंत्रालयाची परवानगी आवश्यकता असते. केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी ८.६५ टक्के व्याज देण्यावर केंद्रीय वित्तीय मंत्रालयाची हरकत नसल्याचे सांगितले. ईपीएफचे सहा कोटींहून अधिक खातेदार आहेत.