वॉशिंग्टन- कोरोनाचे जगात सर्वाधिक मृत्यू झालेल्या अमेरिकेपुढे बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. नोकरी गमाविल्यानंतर ४४ लाख बेरोजगार अमेरिकन नागरिकांनी गेल्या आठवड्यात सरकारी मदतीसाठी अर्ज केले आहेत. कोरोनाच्या फटक्याने व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाल्याने अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली आहे.
अमेरिकेत कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यापासून गेल्या काही आठवड्यांत २.६ कोटी नागरिकांनी सरकारकडे मदतीसाठी अर्ज केले आहेत. कोरोनामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागत आहेत. सहापैकी एक अमेरिकन मार्चच्या मध्यापासून नोकरी गमावित आहे. देशातील नागरिकांनी नोकऱ्या गमाविण्याचा आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विक्रम आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये २० टक्के होईल, असा अर्थतज्ज्ञ अंदाज व्यक्त करत आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: सरकार १५.४० कोटी एचसीक्यू गोळ्यांचा देशात करणार पुरवठा