नवी दिल्ली - टिकटॉकवर देशात बंदी लागू झाल्यानंतर व्हिडिओ अॅप कंपन्यांमध्ये चांगले पर्यायी अॅप देण्यासाठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत थेट गुगल कंपनी उतरली आहे. गुगलने भारतात व्हिडिओ अॅप शॉर्ट्स लाँच केले आहे.
यूट्यूबने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले, की शॉर्टसमधून १५ सेकंद किंवा त्याहून कमी सेकंदाच्या व्हिडिओचा अनुभव घेणे शक्य होणार आहे. क्रिएटर आणि कलावंत हे स्मार्टफोनचा वापर करून व्हिडिओ तयार करू शकतात. येत्या काही दिवसात आम्ही शॉर्टसचे बिटा व्हर्जन भारतात लाँच करणार आहोत. त्यामध्ये नवीन टेस्टिंगचे टूल क्रिएटरला मिळणार आहेत. हे सुरुवातीचे उत्पादन आहे. हे संपूर्ण जगासाठी येत्या काही महिन्यांत उपलब्ध करण्यात येणार आहे.