महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

येस बँकेच्या कामकाजाची गाडी बुधवारपासून येणार रुळावर - येस बँक आर्थिक संकट

येस बँकेने ट्विट करत कामकाज सुरू होणार असल्याचे ट्विट केले आहे. आमच्या १,१३२ पैकी कोणत्याही शाखेला १८ मार्चला भेट द्या, असे ट्विटमध्ये येस बँकेने म्हटले आहे. तसेच बँकेच्या सर्व डिजीटल आणि अॅपच्या सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

Yes Bank
येस बँक

By

Published : Mar 16, 2020, 1:59 PM IST

मुंबई- येस बँकेच्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी रात्री सायंकाळी ६ नंतर सुरू होणार आहेत.

येस बँकेने ट्विट करत कामकाज सुरू होणार असल्याचे ट्विट केले आहे. आमच्या १,१३२ पैकी कोणत्याही शाखेला १८ मार्चला भेट द्या, असे ट्विटमध्ये येस बँकेने म्हटले आहे. तसेच बँकेच्या सर्व डिजीटल आणि अॅपच्या सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-येस बँकेच्या फेररचना आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने तात्पुरते निर्बंध लागू केल्याने खातेदारांना ५० रुपयापर्यंतच पैसे काढण्याची परवानगी देण्यात येत होती. नुकतेच, केंद्र सरकारने येस बँकेच्या फेररचना आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे येस बँकेचा ४९ टक्के हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया घेणार आहे. येस बँकेत आयसीआयसीआय, कोटक बँक, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, फेडरल बँक आणि बंधन बँकेने गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा-कोणतेही सकारात्मक चिन्ह नसल्याने शेअर बाजारात पडझड - गुंतवणूकतज्ज्ञांचे मत

ABOUT THE AUTHOR

...view details