महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

व्यवसायाकरिता सण ठरला चांगला 'मुहूर्त'; शाओमीच्या ५३ लाख स्मार्टफोनची विक्री - Flipkart

रेडमी ७ स्मार्टफोनची सर्वात अधिक फ्लिपकार्टवर विक्री झाली आहे. अ‌ॅमेझॉनवरही शिओमी हा सर्वात अधिक विक्री करणारा स्मार्टफोन ठरला आहे. कंपनीचे स्मार्टफोन प्रति सेकंदाला ५३५ विकण्यात आले आहेत.

संग्रहित - शाओमी

By

Published : Oct 5, 2019, 5:08 PM IST

बंगळुरू - चिनी कंपनी शाओमीने सणासुदीत ५३ लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. या विक्रीने कंपनीने पूर्वीच्या स्मार्टफोनच्या विक्रीचे विक्रम मोडून काढले आहेत.

शाओमी इंडियाच्या ऑनलाईन सेल्स प्रमुख रघु रेड्डी म्हणाले, हा सणाचा महोत्सव आमच्यासाठी अत्यंत आश्चर्यकारक ठरला आहे. आमच्याबरोबर सुमारे ५३ लाख लोकांनी सण साजरा करण्याचे ठरविल्याने अत्यंत उत्साहित आहोत. दरवर्षी आम्ही नवीन उत्पादने आणि सवलती देवून ग्राहकांना अधिक आनंदी करण्याचा प्रयत्न करत आहोत.

हेही वाचा-विदेशी चलन गंगाजळीत विक्रमी वाढ होऊन ४३४.६ अब्ज डॉलरची नोंद

रेडमी ७ स्मार्टफोनची सर्वात अधिक फ्लिपकार्टवर विक्री झाली आहे. अ‌ॅमेझॉनवरही शिओमी हा सर्वात अधिक विक्री करणारा स्मार्टफोन ठरला आहे. कंपनीचे स्मार्टफोन प्रति सेकंदाला ५३५ विकण्यात आले आहेत.

हेही वाचा-पाककृतीत 'ट्रान्स फॅट' मुक्त तेलाचा करणार वापर; १ हजारहून अधिक आचारींनी घेतली शपथ

शाओमीकडून एमआयटीव्ही, एमआय बँड, एमआय पॉवर बँक, एमआय स्मार्टफोन आणि एमआय इकोसिस्टिम उपकरणांची विक्री करण्यात येते. गेल्यावर्षी शाओमीच्या २५ लाख स्मार्टफोनची विक्री झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक शाओमीच्या स्मार्टफोनची विक्री झाली आहे.

हेही वाचा-'कॉर्पोरेट कर कपातीने विदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल'

ABOUT THE AUTHOR

...view details