महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

ग्राहकांना अखंडित सेवा द्या, संजय धोत्रे यांचे दूरसंचार कंपन्यांना आदेश

सर्वांचे काम हे दूरसंचार क्षेत्राशी निगडीत झाले आहे.  त्याशिवाय काम होत नाही. त्या कायम गतिमान होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी व्यक्त केली.

संजय धोत्रे

By

Published : Jul 14, 2019, 1:35 PM IST

मुंबई - टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतिमान आणि अबाधित सेवा द्यावी, असे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. संजय धोत्रे यांनी शनिवारी खासगी टेलिकॉम ऑपरेटर व भारत संचार निगम लि. यांच्या सेवाविषयीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दूरसंचार कंपन्यांना ग्राहकांना अबाधित सेवा देण्याचे निर्देश दिले.

देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दूरसंचार क्षेत्राने अधिक गतीमान सेवा देण्याची गरज संजय धोत्रे यांनी बैठकीत व्यक्त केली. विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रात डिजीटल क्रांती घडत आहे. डिजीटल क्लासरुम, ऑनलाईन पेमेंट गेट वे, डेटा ट्रान्सफर या सर्व सेवांचा संबंध टेलिकॉम क्षेत्राशी जोडला गेला आहे. त्यामुळे या क्षेत्राने गतिमान व्हावी, असे संजय धोत्रे म्हणाले.

दूरसंचार ऑपरेटरने काही ठिकाणी नेटवर्कची अडचण दूर करण्याची गरज आहे. अन्न, वस्त्र व निवारा यांच्यासोबत शिक्षणाचही मुलभूत गरज आहे. आता मुलभूत गरजांमध्ये टेलिकॉम क्षेत्र आले आहे. सर्वांचे काम हे दूरसंचार क्षेत्राशी निगडीत झाले आहे. त्याशिवाय काम होत नाही. त्या कायम गतिमान होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी व्यक्त केली. यावेळी बीएसएनएल व खाजगी दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details