महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

विप्रोच्या नफ्यात तिसऱ्या तिमाहीदरम्यान २.१७ टक्क्यांची घसरण - विप्रो नफा

गतवर्षीच्या तुलनेत  डिसेंबरच्या तिमाहीत विप्रोच्या महसुलाचे प्रमाण २.७ टक्क्यांनी वाढून १५,४७०.५ कोटी रुपये झाले आहे. गतवर्षी डिसेंबरच्या तिमाहीत १५,०५९.५ कोटी रुपयांचा महसुलाची नोंद झाली होती.

Wipro
विप्रो

By

Published : Jan 14, 2020, 8:22 PM IST

नवी दिल्ली - आयटी कंपनी विप्रोच्या नफ्यात २.१७ टक्के घसरण झाल्याचे तिसऱ्या तिमाहीत दिसून आले आहे. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत २,४५५.९ कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. तर गतवर्षी डिसेंबरमध्ये २,५१०.४ कोटी रुपयांचा नफा कंपनीने कमविला होता.

गतवर्षीच्या तुलनेत डिसेंबरच्या तिमाहीत विप्रोच्या महसुलाचे प्रमाण २.७ टक्क्यांनी वाढून १५,४७०.५ कोटी रुपये झाले आहे. गतवर्षी डिसेंबरच्या तिमाहीत १५,०५९.५ कोटी रुपयांचा महसुलाची नोंद झाली होती.

हेही वाचा-आयात कांद्याने वाढविली केंद्र सरकारची चिंता, कारण...

सर्व व्यवसायात आणि भौगोलिक प्रदेशांत कंपनीने समान आणि चांगला वृद्धीदर केल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अबिदाली झेड. नीमुचवाला यांनी म्हटले आहे. ग्राहकांबरोबर दृढसंबंध करण्यावर लक्ष केंद्रित ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विप्रोने प्रति शेअर १ रुपया अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details