नवी दिल्ली - वॉलमार्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि सीईओ ज्यूडिथ मॅकेन्ना यांनी वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची गुरुवारी भेट घेतली. 'मेड इन इंडिया'च्या उत्पादनांना चालना देण्यासाठी व स्थानिक उद्योगांना बाजारपेठ देण्यासाठी चर्चा करण्यात आल्याचे वाणिज्य मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
वॉलमार्ट 'मेक इन इंडिया'ला देणार चालना, कंपनीच्या अध्यक्षांनी घेतली पियूष गोयल यांची भेट - Judith McKenna
पियूष गोयल यांच्या कार्यालयाकडून ज्युडिथ मॅककेन्ना यांच्या भेटीसंदर्भातील ट्विट करण्यात आले आहे. या भेटीत मॅककेन्ना यांनी देशातील उत्पादित वस्तुंना मदत करण्यासाठी बांधिलकी व्यक्त केली.
पियूष गोयल यांच्या कार्यालयाकडून ज्युडिथ मॅककेन्ना यांच्या भेटीबाबतचे ट्विट करण्यात आले आहे. या भेटीत मॅककेन्ना यांनी देशातील उत्पादित वस्तुंना मदत करण्यासाठी बांधिलकी व्यक्त केली. केंद्र सरकारने एकाच ब्रँडकडून होणाऱ्या थेट विदेशी गुंतवणुकीवरील नियम शिथील करणार असल्याची अर्थसंकल्पात घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर वॉलमार्टच्या सीईओने वाणिज्य मंत्र्यांची भेट घेणे ही महत्त्वाची बाब मानली जात आहे.
वॉलमार्टचे देशात २५ घाऊक विक्री केंद्रे आहेत. वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. ई-कॉमर्समध्ये विदेशी कंपन्यांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीबाबत सरकारने कठोर नियम केले आहेत. यामुळे सध्या वॉलमार्ट-फ्लिपकार्टला आव्हानांचा सामना कराव लागत आहे. फ्लिपकार्टमध्ये हिस्सा घेतलेल्या वॉलमार्टला त्यांची उत्पादने ऑनलाईन विकण्यावर सरकारने काही प्रमाणात निर्बंध लादले आहेत. त्यामधून वॉलमार्टला भारतीय बाजारपेठ प्रभावित करण्यापासून रोखण्याचा सरकारचा हेतू आहे. गतवर्षी देशातील व्यापारी संघटनेने वॉलमार्ट-फ्लिपकार्टमधील गुंतवणुकीबाबत भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली होती.