नवी दिल्ली - केंद्र सरकार एजीआरच्या थकित शुल्काची वसुली करण्याकरता दूरसंचार कंपन्यांना दिलेली बँक हमी काढून घेण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्होडाफोन आयडियाचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी आज दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अंशु प्रकाश यांची भेट घेतली आहे.
कुमारमंगलम बिर्ला यांनी दूरसंचार मंत्रालयाच्या सचिवांच्या भेटीत काय चर्चा केली याची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. दूरसंचार विभागाच्या आकडेवारीनुसार व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३,००० हजार कोटी रुपये थकित आहेत. कंपनीने २,५०० कोटी रुपये दूरसंचार विभागाकडे भरले आहेत. तर शुक्रवारी १ हजार कोटी रुपये देणार आहे.