नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी केंद्रीय दूरसंचार विभागाला आज १ हजार कोटी रुपये दिले आहेत. नुकतेच व्होडाफोन आयडियाने थकित एजीआर शुल्कापोटी दूरसंचार विभागाला २,५०० कोटी रुपये दिले आहेत.
शुक्रवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने कंपनीने दूरसंचार विभागाचे आज पैसे दिले आहेत. याबाबत कंपनीने प्रतिक्रिया दिली नाही. व्होडाफोन आयडियाकडे एजीआरचे ५३ हजार कोटी रुपये थकित आहेत. व्होडाफोन आयडियाचे चेअरमन के. एम. बिर्ला आणि एअरटेलचे चेअरमन सुनिल मित्तल यांनी बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे. दोन्ही उद्योजकांनी दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी केली आहे.