नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी लवाद न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) फसवणुकीचे आरोप असलेल्या मॅक्डोनाल्डचे भारतीय भागीदार विक्रम बक्षींना दणका दिला आहे. एनसीएलएटीने बक्षींना देश सोडून जाण्यास मनाई केली आहे.
विक्रम बक्षी यांना परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास एनसीएलएटीचे न्यायाधाीश एस.जे.मुखोपध्याय आणि बन्सी भट यांनी मनाई केली आहे. बक्षींना देश सोडून जाण्यासाठी डीआरटी, डीआएटी आणि एनसीएलएटीची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच हुडकोची थकित असलेले सुमारे १७५ कोटी रुपये भरावे लागणार आहे.
हेही वाचा-भारताला पुन्हा जीएसपीचा दर्जा द्यावा; अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची ट्रम्प सरकारला विनंती
विक्रम बक्षी हे विविध न्यायालयांमधील खटल्यांना सामोरे जात आहेत. माँट्रेऑक्स रिसॉर्ट्सकडून टिस हजारी न्यायालयाात बक्षींनी फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे. या फसणुवकीप्रकरणी ११ ऑक्टोबरला न्यायालयाने समन्स बजाविले होते.
मॅकडॉनाल्ड आणि विक्रम बक्षी यांच्यामधील व्यवहाराची प्रक्रिया निरंक दाखविणे बंधनकारक असणार आहे. मागील सुनावणीत एनसीएलएटीने बक्षी यांना हुडकोची रक्कम भरण्यासाठी शेवटची संधी दिली होती. बक्षींनी १९४ कोटी रुपये भरावेत, असा हुडकोने दावा केला आहे.