मुंबई - कोरोनाच्या संकटात अनेक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमाविण्याची भीती आहे. अशा स्थितीत सॉफ्टवेअरची निर्यात करणारी कंपनी टीसीएसने ४.५ लाख कर्मचाऱ्यांपैकी कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून कमी करणार नसल्याचे म्हटले. मात्र, चालू वर्षात कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचेही कंपनीने सांगितले.
टाटा ग्रुपने सुमारे ४० हजार जणांना नोकऱ्यांची ऑफर दिली आहे. या प्रत्येकाचा आदर राखत त्यांना नोकरीत घेतले जाणार असल्याचे टीसीएसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काही ब्ल्यू चिप कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यावर फेरविचार करणार असल्याचे म्हटले आहे.