नवी दिल्ली- टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांना वर्ष २०२०-२१ मध्ये एकूण भत्त्यांसह वार्षिक वेतन २०.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना वर्ष २०१९-२० मध्ये एकूण भत्त्यांसह वार्षिक वेतन १३.३ कोटी रुपये मिळाले होते. ही माहिती कंपनीच्या वार्षिक अहवालामधून समोर आली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ राजेश गोपीनाथन यांना मागील वर्षात एकूण भत्त्यांसह वार्षिक वेतन २०.३६ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये १.२७ कोटी वेतन, २.०९ कोटीचे लाभ, इतर भत्ते १७ कोटी रुपयांचे मिळाले आहेत.
हेही वाचा-टीसीएसकडून कोरोना महामारीतही कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा वेतनवाढ
एन. गपपथी सुब्रमण्यम यांच्या भत्त्यात ५५.२२ टक्के वाढ-
टीसीएसचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर एन. गपपथी सुब्रमण्यम यांना मागील आर्थिक वर्षात १६.१ कोटी रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले. त्यामध्ये १.२१ कोटी रुपये वेतन, १.८८ कोटी रुपयांचे लाभ व इतर भत्त्यापोटी १३ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना मिळणाऱ्या व्यवस्थापकीय भत्त्यात ५५.२२ टक्के वाढ झाली आहे. बाजारातील बदल आणि इतर देशांप्रमाणे ही भत्त्यात वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.