हैदराबाद- भारतीय आयटी कंपन्यांचा जगात दबदबा असल्याचे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) सिद्ध केले आहे. टीसीएस ही जगातील सर्वात भांडवली मूल्य असलेली आयटी कंपनी ठरली आहे. टीसीएसने आयटी कंपन्याच्या भांडवली मूल्यात जगात प्रथम असलेल्या अक्सेंचरला मागे टाकले आहे.
टीसीएसचे शेअर गुरुवारी ३ टक्क्यांनी वाढले आहेत. मुंबई बाजार बंद होताना टीसीएसच्या शेअरची किंमत २ हजार ८२५ रुपये आहे. या शेअरच्या वाढलेल्या किमतीनंतर टीसीएसचे भांडवली मूल्य हे १४४.७ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. तर अक्सेंचर भांडवली मूल्य हे १४३.७४ अब्ज डॉलर आहे.