महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीत फेब्रुवारीमध्ये ३४ टक्क्यांनी घसरण

व्यापारी वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये ३५ टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारीत २५,५७२ व्यापारी वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीत ३९,१११ व्यापारी वाहनांची विक्री झाली होती.

Tata Motors
टाटा मोटर्स

By

Published : Mar 2, 2020, 2:00 PM IST

मुंबई - टाटा मोटर्सच्या देशातील वाहन विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारीत ३४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये ५७,२२१ वाहनांची विक्री झाली होती. यंदा ३८,००२ वाहनांची विक्री झाली आहे.

व्यापारी वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारीमध्ये ३५ टक्क्यांची घसरण झाली आहे. फेब्रुवारीत २५,५७२ व्यापारी वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीत ३९,१११ व्यापारी वाहनांची विक्री झाली होती. ही माहिती टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिली आहे.

टाटा मोटर्स कंपनीचे अध्यक्ष (व्यापारी वाहन विक्री विभाग) गिरीष वाघ म्हणाले, आम्ही बीएस-६ वाहनांच्या स्थलांतरणाकडे वळत आहोत. बीएस-४ वाहनांची नियोजनाप्रमाणे विक्री झाली आहे. बीएस-६ वाहनांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात; जाणून घ्या आजचे दर

चीनमधील नोव्हेल कोरोना विषाणुचा बीएस-६ वाहनांच्या उत्पादनांवर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. हा परिणाम कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. फेब्रुवारीमध्ये १२,४३० प्रवासी वाहनांची विक्री झाली आहे. ही विक्री गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी कमी विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये १८,११० वाहनांची विक्री झाली होती.

हेही वाचा-विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत महानगरांमध्ये ५३ रुपयांनी कपात

ABOUT THE AUTHOR

...view details