महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एसबीआयच्या शाखेचे लडाखमध्ये १० हजार फूट उंचीवरील गावात उद्घाटन - दिक्सित

लडाखची केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यापूर्वीच दिक्सितमधील शाखा सुरू करण्याचे तीन महिन्यापूर्वी ठरले होते. राज्य पातळीवरील बँकिंग समितीचे समन्वय म्हणून लडाखमध्ये काम करण्याची तयारीही एसबीआयने दाखविली.

दिस्कितमधील एसबीआय बँक

By

Published : Sep 15, 2019, 4:24 PM IST

दिस्कित (लडाख) - लडाखमधील १० हजार फूट उंचीवरील दिस्कित गावात एसबीआयच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे एसबीआयची लडाख प्रदेशातील १४ वी बँकेची सुविधा सुरू होणार आहे. तर देशातील २२ हजार २४ वी शाखा होणार आहे.

एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी शनिवारी दिस्कित गावामध्ये बँकेच्या शाखेचे उद्घाटन केले. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने उत्तराखंड या नवीन केंद्रशासित प्रदेशातील मोठी आघाडीची बँक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. लडाखची केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यापूर्वीच दिक्सितमधील शाखा सुरू करण्याचे तीन महिन्यापूर्वी ठरले होते. राज्य पातळीवरील बँकिंग समितीचे समन्वय म्हणून काम करण्याची तयारीही एसबीआयने दाखविली.

हेही वाचा-विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सप्टेंबरमध्ये १ हजार ८४१ कोटींच्या शेअरची ठोक खरेदी

रजनीश कुमार म्हणाले, प्रदेशात सरासरी कर्जाचे प्रमाण हे केवळ ५ लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमामधून आम्ही दुर्गम भागातही सेवा देत आहोत. दिस्कित हे पाकिस्तानच्या सीमेपासून ९० किमी अंतरावर आहे. स्थानिक लोकसभा खासदार जमयांग त्सरिंग नामग्याल यांनी एसबीआयने शाखा सुरू करणाच्या निर्णयाचे स्वागत केले.

हेही वाचा-मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर नितीन गडकरी म्हणतात, ही कठीण वेळही निघून जाईल !

बँक शाखेमुळे लोकांना बचत करण्याचे साधन मिळणार आहे. त्यामुळे त्यांना कर्जपुरवठा मिळेल व प्रदेशाचा विकास होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details