बंगळुरु - विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिद अली नीमुचवाला यांनी कौटुंबिक कारणांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती होईपर्यंत ते सीईओ म्हणून काम करणार असल्याचे विप्रो कंपनीने म्हटले आहे.
विप्रोच्या संचालक मंडळाकडून नीमुचवाला यांच्याजागी नियुक्ती करण्यासाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी किती वेळ लागू शकेल, हे कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान आणि आदराची गोष्ट राहिल्याचे अबिद अली नीमुचवाला यांनी सांगितले.