महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

पीएमसी खातेदारांना आरबीआयकडून किंचित दिलासा; पैसे काढण्याच्या मर्यादेत 'एवढी' केली वाढ - Money withdraw limit through PMC

पैसे काढणे ग्राहकांना सहज शक्य व्हावे, यासाठी आरबीआयने पीएमसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची ग्राहकांना परवानगी दिली आहे.

संग्रहित -पीएमसी

By

Published : Nov 5, 2019, 6:38 PM IST

मुंबई- पंजाब आणि महाराष्ट्र को-ओपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना भारतीय रिझर्व्ह बँकेने किंचित दिलासा दिला आहे. आरबीआयने ग्राहकांकरिता पीएमसीच्या खात्यामधून पैसे काढण्याची मर्यादा ४० हजार रुपयांवरून ५० हजार रुपये केली आहे.


पैसे काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी आरबीआयने पीएमसी बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याची ग्राहकांना परवानगी दिली आहे. आरबीआयने पीएमसीवर निर्बंध लागू केल्याने बँकेचे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. आरबीआयने १४ ऑक्टोबरला पैसे काढण्याची मर्यादा २५ हजार रुपयांवरून ४० हजार रुपये केली होती. त्यामुळे बँकेचे ७८ टक्के खातेदारांना पूर्ण पैसे काढता येतील, असे आरबीआयने म्हटले होते.

आरबीआय जवळून परिस्थितीवर देखरेख ठेवत आहे. पीएमसीच्या ठेवीदारांचे हितसंरक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे आरबीआयने म्हटले आहे. पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेत पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी ऐन दिवाळीत आरबीआय कार्यालसमोर निदर्शने केली आहेत. बँकेतील पैसे परत करावेत, अशी ठेवीदारांनी मागणी आहे.


बँकेत ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा -

आर्थिक गुन्हे शाखेने एचडीआयएल ग्रुपचे राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग यांना पीएमसीमधील घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तसेच बँकेचा माजी चेअरमन वारयम सिंग व बँकेचा माजी व्यवस्थापकीय संचालक हेदेखील अटकेत आहेत. पीएमसीमध्ये सुमारे ४ हजार ३५५ कोटींचा घोटाळा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details