नवी दिल्ली - टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्याचे आदेश एनसीएलएटीने दिले होते. या निकालाला टाटा सन्स पाठोपाठ रतन टाटा यांनीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एनसीएलएटीने दिलेला निकाल हा चुकीचा आणि विसंगत असल्याचे टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत म्हटले आहे. .
रतन टाटा यांनी टाटा सन्स व्यतिरिक्त स्वतंत्र याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की, सायरस मिस्त्री यांची व्यावसायिक क्षमतेप्रमाणे नियुक्ती करण्यात आली होती. शापूरजी पाल्लूनजी ग्रुपचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नव्हती.