महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रतन टाटांची ओला इलेक्ट्रीक मोबाईलिटीमध्ये गुंतवणूक - Ola Electric Mobility Pvt Ltd

ओईएमपीएल ही सध्या चार्जिंग, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि दुचाकी, तीन चाकीसह चारचाकी वाहनांवर प्रायोगिक कामे करत आहे.

रतन टाटा

By

Published : May 6, 2019, 5:47 PM IST

मुंबई- टाटा सन्सचे निवृत्त चेअरमन रतन टाटा यांनी ओला इलेट्रीक व्हीकलमध्ये (ईव्ही) गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक ओला ईलेट्रीक मोबाईलिटी प्रायव्हेट लि. (ओईएमपीएल) कंपनीचा भाग असल्याचे ओलाने म्हटले आहे.


टाटा सन्सने सुरुवातीच्या टप्प्यात ओलाची पेरेंट कंपनी एएनआय टेक्नॉलिजीस प्रायव्हेट लि.मध्येही गुंतवणूक केली होती. रतन टाटा म्हणाले, की ईलेट्रीक व्हिकलची इकोसिस्टिम ही रोज नाट्यमयरीत्या सुधारत आहे. यामध्ये ओला ईलेक्ट्रिक ही महत्त्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास वाटतो. मी नेहमीच भाविश अग्रवाल याच्या व्हिजनचे कौतुक केले आहे. मला आत्मविश्वास आहे, हे पाऊल नव्या व्यवसायाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

रतन टाटांच्या गुंतवणुकीवर सीईओंनी दिली प्रतिक्रिया-
ओईएमपीएल ही सध्या चार्जिंग, बॅटरी स्वॅपिंग स्टेशन आणि दुचाकी, तीन चाकीसह चारचाकी वाहनांवर प्रायोगिक कामे करत आहे. गेली काही वर्षे रतन टाटा हे ओलाच्या प्रवासात मला मार्गदर्शक आणि प्रेरक म्हणून सहकार्य करत आहेत. त्यांचे ओला ईलेक्ट्रिकच्या मंडळावर गुंतवणुकदार आणि मार्गदर्शक म्हणून स्वागत करत असल्याचे भाविश अग्रवाल ( ओलाचे सहसंस्थापक आणि सीईओ) यांनी म्हटले आहे.

देशात १० लाख ईलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट-
ओईएमपीएलने वेगवेगळ्या गुंतवणुकदारांकडून ४०० कोटी रुपये गोळा केले आहेत. कंपनीने २०२१ पर्यंत देशात १० लाख ईलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कंपनीने ईलेक्ट्रिक मोबाईलिटी पायलट कार्यक्रम हा नागपूरमध्ये सुरू केला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details