महाराष्ट्र

maharashtra

स्टारलिंक इंटरनेटच्या सेवेकरता भारतामध्ये आगाऊ नोंदणी सुरू

By

Published : Mar 3, 2021, 8:18 PM IST

Updated : Mar 3, 2021, 8:45 PM IST

स्टारलिंक उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. यामधून जगभरातील दुर्गम भागातही कमी दरात ३०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.

एलॉन मस्क
एलॉन मस्क

नवी दिल्ली - एलॉन मस्कची मालकी असलेल्या स्पेसएक्स स्टारलिंक इंटरनेट कंपनीने भारतासह जगभरात सेवा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. स्टारलिंकने २०२२ पर्यंत भारताच्या काही भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी आगाऊ नोंदणी सुरू केली आहे. आगाऊ नोंदणी केल्यास ९९ डॉलरपर्यंतची रक्कम कंपनीकडून ग्राहकांना परत दिली जाणार आहे.

'मर्यादित जागा आहेत. पहिल्यांदा येणाऱ्यांना प्राधान्यांची ऑर्डर पूर्ण करण्यात येईल', असे स्टारलिंकने वेबसाईटवर म्हटले आहे. इंटरनेटसाठी आगाऊ नोंदणी ही इंडिया कॉलनी रोड, बापूनगर, अहमदाबाद, गुजरात, इंडिया कॉफी हाऊस रोड, इंदूर, मध्यप्रदेश या भागांसाठी होणार आहे. स्टारलिंक उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. यामधून जगभरातील दुर्गम भागातही कमी दरात ३०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे.

हेही वाचा-जाणून घ्या, गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची कारणे

  • कंपनीकडून सध्या ५० ते १५० एमबीपीएस वेगाने इंटरनेट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. स्टारलिंक प्रकल्पामध्ये वेगवान इंटरनेट देण्यासाठी १२ हजार उपग्रहाचे जाळे तयार करण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच कंपनीने १ हजार उपग्रह हे पृथ्वीच्या कक्षेत सोडले आहेत.
  • विशेष म्हणजे अ‌ॅमेझॉनने कुईपर प्रकल्पामधून परवडणाऱ्या दरात इंटरनेट देण्याचे ध्येय निश्चित केले आहे. दरम्यान, स्पेसएक्सने भारत सरकारला नोव्हेंबरमध्ये उपग्रह तंत्रज्ञान देण्याची विनंती केली होती. त्याचा वापर देशातील दुर्गम भागात करण्यात येणार असल्याचे स्पेसएक्सने म्हटले आहे.

हेही वाचा-साखरेच्या उत्पादनात फेब्रुवारी २०२०-२१ मध्ये २० टक्क्यांची वाढ

Last Updated : Mar 3, 2021, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details