महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

१२ वर्षांहून अधिक वयोगटाकरिता कोरोना लस प्रभावी- फायझरची केंद्राला माहिती

लशींचे मिळणारे संरक्षण आणि कंपनीच्या अटीत शिथीलता करण्याबाबत केंद्र सरकारने फायझर कंपनीबरोबर चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. चालू वर्षात फायझरकडून काही अटींसहित ५ कोटी लशींचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

Pfizer
फायझर

By

Published : May 27, 2021, 5:03 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असताना फायझरची लस देशात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिकन औषध कंपनीने फायझरने विकसित केलेली लस ही १२ वर्षे आणि १२ वर्षांहून अधिक वयोगटासाठी योग्य असल्याची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. ही फायझरची लस २ ते ८ डिग्री अंश सेल्सियस तापमानात एक महिनांहून अधिक काळ राहू शकते, असे सूत्राने सांगितले.

लशींचे मिळणारे संरक्षण आणि कंपनीच्या अटीत शिथीलता करण्याबाबत केंद्र सरकारने फायझर कंपनीबरोबर चर्चा केल्याचे सूत्राने सांगितले. चालू वर्षात फायझरकडून काही अटींसहित ५ कोटी लशींचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील दुसरी औषध कंपनी मॉडर्नाकडून भारतात सिप्लाह इतर कंपन्यांच्या मदतीने लस उत्पादन होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा-चलनी नोटा छापण्याची वेळ आली - उदय कोटक यांचा केंद्राला सल्ला

मॉडर्ना आणि फायझर कंपन्यांकडून राज्यांना थेट लस देण्यास नकार-

मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही कंपन्यांनी राज्यांना थेट लस पुरवठा करण्यासाठी नकार दिला आहे. यामध्ये पंजाब, दिल्ली या राज्यांचा समावेश आहे. अमेरिकेतील औषधी कंपन्यांकडून केवळ केंद्र सरकारबरोबर लस विक्रीसाठी सौदा करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

हेही वाचा-'नव्या सोशल मीडियाच्या नियमाबाबत व्हॉट्सअपच्या वापरकर्त्यांनी घाबरण्यासारखे काही नाही'

प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये तयार होतात अधिक अँटिबॉडीज-

अमेरिकेची अन्न आणि औषध प्रशासनाने फायझर लस ही लहान मुलांसाठी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. या लशीची चाचणी १२ ते १५ वयोगटातील २ हजारांहून अधिक मुलांवर घेण्यात आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे लस घेतलेल्या मुलांमध्ये कोरोनाला प्रतिबंधक अशा अँटीबॉडीज या प्रौढांच्या तुलनेत अधिक तयार होत असल्याचे आढळून आले आहे. फायझर आणि जर्मन पार्टनर बायोनटेक कंपनीने लशीच्या वापरासाठी युरोपीयनसह इतर देशांमध्ये परवानगी मागितली आहे. फायझर ही लहान मुलांसाठी लस उत्पादन करणारी एकमेव कंपनी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details