नवी दिल्ली - पेटीएम मनीची मालकी असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्सने प्रवीण जाधव यांची व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ म्हणून निवड केली आहे. कंपनी पेटीएममध्ये येत्या दोन ते तीन वर्षात २५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.
पेटीएम मनीच्या सीईओपदी प्रवीण जाधव यांची निवड - पेटीएम
पेटीएम हा सर्वात मोठे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे माध्यम ठरले आहे. या व्यवसायाचा शेअर बाजार, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) आणि इतर गुंतवणुकीच्या उत्पादनात विस्तार करण्यात येणार आहे.
पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात संस्थेची बांधणी झाली आहे. तसेच उत्पादन आणि व्यवसायाचा विस्तार झाला आहे. पुढे ते म्हणाले, प्रवीण हे खरे आंत्रेप्रेन्युअर आहेत. त्यांनी पेटीएम हा सर्वात मोठे म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे माध्यम ठरले आहे. या व्यवसायाचा शेअर बाजार, राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) आणि इतर गुंतवणुकीच्या उत्पादनात विस्तार करण्यात येणार आहे. मला खूप अभिमान आहे, संचालक आणि सीईओ म्हणून प्रविण कंपनीचे नेतृत्व करणार आहे.
जाधव यांनी यापूर्वी पूर्णवेळ संचालक म्हणून काम केले आहे. पेटीएमच्याआधी त्यांनी सर्व्हीफाय आणि रेडिफमध्ये काम केले. तसेच ते विशबर्गचे संस्थापक आणि सीईओ होते. पेटीएम मनीचे ३० लाखांवरून अधिक वापरकर्ते आहेत.