नवी दिल्ली- डिजीटल देयकामधील आघाडीची कंपनी पेटीएम येस बँकेमध्ये हिस्सा घेण्यासाठी उत्सुक आहे. त्यासाठी पेटीएमची येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे.
येस बँकेमध्ये हिस्सा घेण्याकरिता पेटीएमची चर्चा सुरू
प्राथमिक पातळीवर राणा कपूर यांची पेटीएमबरोबर चर्चा झाली आहे. आरबीआयच्या मंजुरीवर कराराचे स्वरुप असेल, असे सूत्राने सांगितले.
येस बँक
प्राथमिक पातळीवर राणा कपूर यांची पेटीएमबरोबर चर्चा झाली आहे. आरबीआयच्या मंजुरीवर कराराचे स्वरुप असेल, असे सूत्राने सांगितले. विजय शेखर शर्मा यांचा पेटीएम बँकेत हिस्सा आहे. याबाबत पेटीएमने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कपूर यांचा येस बँकेत ९.६ टक्के हिस्सा आहे. येस बँकेचे सीईओ रवनीत गिल यांनी बँकेचे प्रशासन आणि नियमांचे पालन करण्यावर भर असल्याचे सांगितले.