महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सायरस मिस्त्री प्रकरण : टीसीएसचे एनसीएलएटी निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल - सायरस मिस्त्री

टीसीएसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कायदेशीर मत घेतल्यानंतर ३ जानेवारी २०२० ला सर्वोच्च न्यायालयात एनसीएलएटीच्या निकालाविरोधात याचिका दाखल केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

TCS
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

By

Published : Jan 4, 2020, 7:08 PM IST

नवी दिल्ली - टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या टाटा ग्रुपच्या कंपनीने एनसीएलएटीने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी फेरनियुक्ती करावी, असे एनसीएलएटीने डिसेंबरमध्ये आदेश दिले आहेत.


टीसीएसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची शेअर बाजाराला माहिती दिली आहे. कायदेशीर मत घेतल्यानंतर ३ जानेवारी २०२० ला सर्वोच्च न्यायालयात एनसीएलएटीच्या निकालाविरोधात याचिका दाखल केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा- सायरस मिस्त्री प्रकरण : रतन टाटा यांची सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका

टाटा सन्सचे सर्वोच्च न्यायालयात अपिल
राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (एनसीएलएटी) दिलेल्या संपूर्ण आदेशाला टाटा सन्सने आव्हान दिले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची ९ जानेवारीला बैठक आहे. त्यापूर्वी एनसीएलएटीच्या निकालाला स्थगिती मिळावी, यासाठी कंपनीचे प्रयत्न आहेत.

रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात केले आहे अपिल-
रतन टाटा यांनीही एनसीएलएटीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एनसीएलएटीने दिलेला निकाल हा चुकीचा आणि विसंगत असल्याचे टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत म्हटले आहे. रतन टाटा यांनी टाटा सन्सचे नाव करण्यासाठी अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतीत केले आहे. त्यामुळे पुराव्याविना दिलेला एनसीएलएटीचा (राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरण) निकाल हा अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा डोकोमोसोबतच्या केलेल्या व्यवहारामुळे कंपनीच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचेही रतन टाटा यांनी याचिकेत म्हटले आहे.

संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण: टाटा सन्सचे सर्वोच्च न्यायालयात अपिल

एनसीएलएटीने काय दिला होता निकाल?
एनसीएलएटीने मिस्त्री यांची टाटा सन्सच्या चेअरमनपदी पुन्हा नियुक्ती करण्याचे डिसेंबर २०१९ मध्ये आदेश दिले आहेत. तर एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी चेअरमनपदावरील नियुक्तीही एनसीएलएटीने बेकायदेशीर असल्याचे निकालात म्हटले होते. दोन सदस्यीय एनसीएलएटीने टाटा सन्सला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details