महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वेतनवाढीवरून वैमानिक संघटनेने एअर इंडियाला दिला 'हा' इशारा - एअर इंडिया बातमी

आयसीपीएने एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांना पत्र पाठवून वेतनवाढीविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. संघटनेने लिहिलेल्या पत्रात म्हटले, की सध्याची परिस्थिती अशी आहे, की वेतनवाढीतील बेकायदेशीर बदलामुळे मोठ्या प्रमाणावर कंपनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

air india
एअर इंडिया

By

Published : Jul 20, 2020, 7:07 PM IST

नवी दिल्ली – वेतन तडजोडीमधील एकतर्फी बदल हा बेकायदेशीर ठरेल, असा हा इशारा भारतीय वाणिज्य वैमानिक संघटनेने (आयसीपीए) एअर इंडियाच्या व्यस्थापनाला दिला आहे. हा एकतर्फी बदल सध्याच्या महत्त्वाच्या क्षणी सरकारी विमान कंपनीच्या हितासाठी नसेल, असेही आयसीपीएने म्हटले आहे.

आयसीपीएने एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांना पत्र पाठवून वेतनवाढीविषयीची भूमिका स्पष्ट केली आहे. संघटनेने लिहिलेल्या पत्रात म्हटले, की सध्याची परिस्थिती अशी आहे, की वेतनवाढीतील बेकायदेशीर बदलामुळे मोठ्या प्रमाणावर कंपनीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वैमानिक संघटनेचे पत्र

हेही वाचा -देशात कोरोनाचा विळखा घट्ट; गेल्या 24 तासात 40 हजार 425 जणांना संसर्ग

नागरी विमान वाहतूक मंत्रालय वेतनवाढीबाबत तडजोडीची चर्चा न करता केवळ आदेश कळवित आहे. वेतनाच्या एकूण 70 टक्क्यांहून अधिक भत्ते आहेत. हे भत्ते एप्रिल 2020 पासून एअर इंडियाने दिले नाही. सर्वच वेतन भत्ते सातत्याने उशीरा मिळत आहेत. वेतनवाढीबाबतची कोणतीही सत्यप्रत न देता केवळ तोंडी प्रस्ताव विस्ताराने सांगण्यात आल्याचा वैमानिक संघटनेने दावा केला आहे. भारतीय घटनेप्रमाणे समान अधिकार आहे, असेही आयसीपीएने म्हटले आहे. सध्या, एअर इंडिया विक्रीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांना बोलीचे अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details