नवी दिल्ली- वाहन उद्योगावर असलेला मंदीचा प्रभाव ऑक्टोबरमध्येही कायम राहिला आहे. सर्वच प्रकारच्या वाहन प्रकारात एकूण १२.७६ टक्के घसरण झाली आहे. वाहन उद्योगाला ऑक्टोबरमध्ये दिवाळी, दसरा अशा सणाच्या मुहुर्तावर चांगला व्यवसाय होईल, अशी अपेक्षी होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरल्याचे आकडेवारीमधून दिसून आले आहे.
दिवाळीतही वाहन उद्योगावर मंदीचा प्रभाव; ऑक्टोबरमध्ये विक्रीत १२.७६ टक्के घसरण - Society of Indian Automobile Manufacturers data
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहन विक्रीची आकडेवारी आज जाहीर केली आहे. सर्वच प्रकारच्या वाहन विक्रीत ऑक्टोबरमध्ये १२.७६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
संग्रहित- वाहन उद्योग मंदी
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहन विक्रीची आकडेवारी आज जाहीर केली आहे. सर्वच प्रकारच्या वाहन विक्रीत ऑक्टोबरमध्ये १२.७६ टक्के घसरण झाल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये २४ लाख ९४ हजार ३४५ वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा २१ लाख ७६ हजार १३६ वाहनांची विक्री झालेली आहे.
हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; निर्देशांकात १०० अंशाची घसरण
- देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीत अंशत: ०.२८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा २ लाख ८५ हजार २७ वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी २ लाख ८४ हजार २२३ वाहनांची विक्री झाली होती.
- देशातील कारच्या विक्रीत ६.३४ टक्के घसरण झाली आहे. गतवर्षी १ ला ८५ हजार ४०० कारची ऑक्टोबरमध्ये विक्री झाली होती. यंदा ऑक्टोबरमध्ये १ लाख ७३ हजार ६४९ कारची विक्री झाली आहे.
- वाहन उद्योगातील मंदीचा फटका हा मोटारसायकल विक्रीला बसला आहे. यंदा मोटारसायकलची विक्री गतवर्षीच्या तुलनेत १५.८८ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर दुचाकींच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये गतवर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत १४.४३ टक्के घसरण झाली आहे. व्यापारी वाहनांच्या विक्रीत घट होवून ऑक्टोबरमध्ये ६६ हजार ७७३ वाहनांची विक्री झाली आहे.
- एकंदरीत प्रवासी वाहने वगळता वाहनांच्या सर्वच श्रेणीत घसरण झाली आहे.