मुंबई- टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत निराशा व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एनएसीएलएटीचे आदेश रद्द केल्याने सायरस मिस्त्री यांना पुन्हा टाटा सन्सचे चेअरमन पद मिळू शकणार नाही. त्याबाबत प्रतिक्रिया देताना मिस्त्री म्हणाले की, माझी सद्विवेकबुद्धी स्पष्ट आहे. अल्पसंख्यांक शेअर भागीदार म्हणून वैयक्तिकरित्या निराश असल्याचे मिस्त्री यांनी म्हटले आहे.
सायरस मिस्त्री म्हणाले की, जरी मी टाटा ग्रुपवर थेट प्रभाव टाकण्यास सक्षम नाही. असे असले तरी मी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे पडसाद उमटतील, अशी आशा आहे. मी स्पष्ट अशा सद्विवेकबुद्धीने झोपतो. आयुष्य नेहमीच छान असू शकत नाही. मात्र, मला माझे कुटुंब, मित्र, आजी-माजी सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. मी माझ्या कायदेशीर टीमबाबत कृतज्ञ आहे. टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी मिळाली होती, त्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संबंधित बातमी वाचा-सायरस मिस्त्रींबरोबरील वादात 'सर्वोच्च' विजय; रतन टाटांनी ही' दिली प्रतिक्रिया
रतन टाटा यांनी ही दिली होती प्रतिक्रिया-