महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्तुत्य! मारुती सुझुकीच्या मदतीने दर महिन्याला १० हजार व्हेटिंलेटरचे होणार उत्पादन - व्हेटिंलेटर

अक्वा हेल्थकेअर ही तंत्रज्ञानातील कामगिरी आणि व्हेटिंलेटरचे उत्पादन आणि विक्रीसाठी जबाबदार असणार आहे. मारुती सुझुकीकडून व्हेटिंलेटरच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

मारुती सुझुकी
मारुती सुझुकी

By

Published : Mar 28, 2020, 3:58 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा विळखा वाढत असताना देशात अधिक व्हेटिंलेटरची गरज लागणार आहे. अशावेळी वाहन उत्पादन कंपनी मारुती सुझुकीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीकडून अॅग्वा हेल्थकेअरबरोबर दर महिन्याला १० हजार व्हेटिंलेटरचे उत्पादन घेणार आहे.

अक्वा हेल्थकेअर ही तंत्रज्ञानातील कामगिरी आणि व्हेटिंलेटरचे उत्पादन आणि विक्रीसाठी जबाबदार असणार आहे. मारुती सुझुकीकडून व्हेटिंलेटरच्या सुट्ट्या भागांचा पुरवठा करण्यात येणार आहे. व्हेटिंलेटरच्या उत्पादनासाठी मारुती सुझुकीकडील उत्पादनाचे अद्ययावतीकरण आणि गुणवत्ता नियंत्रणासाठी असलेल्या अनुभवाचा फायदा होणार आहे. तसेच मारुती सुझुकी वित्तपुरवठा आणि उत्पादनासाठी लागणारे सर्व परवाने मिळविण्यासाठी मदत करणार आहे.

हेही वाचा-'आपण मंदीतच, ही स्थिती २००९हून अधिक वाईट असणार'

मारुती सुझुकी पूर्णपणे या मोफत अॅग्वा हेल्थकेअर कंपनीला देणार आहे. तसेच मारुती सुझुकीबरोबर संलग्न असलेली कंपनी कृष्णा मारुती तीनस्तरीय मास्कचे उत्पादन घेणार आहे. या मास्कचा हरियाणा आणि केंद्र सरकारला पुरवठा करण्यात येणार आहे. या मास्कचे लवकरच उत्पादन घेण्यात येणार आहेत. त्यासाठी अशोक माथूर हे स्वत:च्या पैशातून २० लाख मास्कचे वितरण करणार आहेत.

हेही वाचा-कोरोनाशी लढा: एचआयव्हीसह मलेरियावरील औषधांचा साठा किती? सरकारने मागविली माहिती

मारुती सुझुकीबरोबर भारत सीट्स कंपनीचा भागीदारीत प्रकल्प आहे. या कंपनीकडून कोरोनापासून बचाव करण्यासाठी संरक्षण वस्त्राचे उत्पादन करण्यात येणार आहे. सरकारच्या आदेशाप्रमाणे सर्व कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details