मुंबई - ज्वेलरी विक्री करणारी कंपनी मलबार गोल्ड आणि डायमंड्सने 1 लाख मोफत लशींसाठी 8 कोटींची मदत जाहीर केली आहे. ही मदत कंपनीने चॅरीटबल ट्रस्ट आणि रुग्णालयाच्या मदतीने जाहीर करण्यात आली आहे.
मलबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद म्हणाले, की कोरोनाच्या मोठ्या संकटाचा देश सामना करत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे झाले आहे. लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहिमेत पहिले पाऊल म्हणून आम्ही योगदान दिले आहे. कंपनीच्या सेवा आणि पायाभूत सुविधांचा वापर हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कोरोना लसीकरणासाठी करण्यात येणार आहे. कंपनीच्या परिसरात व आघाडीच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून 'आयुष्यमान भारत'ला ठेंगा; तरतुदीपैकी केवळ ७ टक्के निधी - आरटीआय
2021 पर्यंत कोरोना लसीकरण पूर्ण होईल