नवी दिल्ली- वाहन उद्योग तीव्र मंदीतून जात असतानाच महिंद्रा अँड महिंद्रानेही उत्पादन प्रकल्प काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ८ ते १४ दिवस चालू तिमाहीदरम्यान उत्पादन थांबविण्याचा शुक्रवारी निर्णय घेतला आहे. मागणी व उत्पादन याचा मेळ घालण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
एम अँड एम ८ ते १४ दिवस वाहनांचे कोणतेही उत्पादन घेणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. एम अँड एमचे उत्पादन गतवर्षीच्या तुलने एप्रिल-जुलै तिमाहीदरम्यान ८ टक्क्याने घसरले होते. कंपनीच्या वाहनांची निर्यातीसह एकूण विक्री ८ टक्क्याने कमी झाली आहे. बाजारामधील वाहनांच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार असल्याने एम अँड एमने म्हटले आहे. बाजारामध्ये वाहनांची पुरेशी संख्या असल्याचे कंपनीने म्हटले आहे. महिंद्राच्या वाहनांची जुलैमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्क्यांनी विक्री घसरली होती.