नवी दिल्ली- अॅमेझॉनने स्थानिक दुकानांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म देण्यासाठी सेवा लाँच केली आहे. 'लोकल शॉप्स ऑन अॅमेझॉन' या सेवेमधून लहान दुकाने आणि किरकोळ विक्रेत्यांना ऑनलाईन उत्पादने विकता येणार आहेत.
रिलायन्सने जिओमार्ट-व्हॉट्सअॅपच्या भागीदारीतून किराणा दुकाने ऑनलाईन करण्याची घोषणा केल्यानंतर अॅमेझॉनही स्पर्धेत वेगाने पावले टाकायला सुरुवात केली आहे. अॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष (विक्रेते सेवा) गोपाल पिल्लई म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही ५ हजार ऑफलाईन विक्रेत्यांसाठी प्रायोगिक कार्यक्रम सुरू केला आहे. यामधून स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाईन सेवेचा लाभ देणे हा हेतू आहे. त्यासाठी अॅमेझॉनकडून १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामध्ये दुकानदारांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा उद्देश आहे.