नवी दिल्ली- ज्या ग्राहकांची विमा योजना (पॉलिसी) दोन वर्षाहून अधिक काळ बंद आहे, अशा नागरिकांना एलआयसीने खूशखबर दिली आहे. अशा ग्राहकांना पुन्हा विमा योजना सुरू करता येणार आहेत. या निर्णयाने बंद पडलेल्या पॉलिसीचे प्रमाण कमी होईल, अशी एलआयसीची अपेक्षा आहे.
सध्याच्या नियमानुसार दोन वर्षांहून अधिक काळ बंद पडलेली पॉलिसी सुरू करता येत नाही. यामध्ये १ जानेवारी २०१४ नंतर घेतलेल्या पॉलिसीचा समावेश आहे. ग्राहकांना अधिक फायदा मिळून देण्यासाठी एलआयसीने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) नियमात बदल करण्याची विनंती केली. त्यानंतर आयआरडीएआयने दोन वर्षे जुन्या बंद पडलेल्या पॉलिसी सुरू करण्याची एलआयसीला परवानगी दिली आहे.
हेही वाचा-इंडिगोच्या सर्व्हरमध्ये बिघाड; विमानतळांवर त्रस्त प्रवाशांच्या लागल्या रांगा