नवी दिल्ली - नव्या वर्षात बहुतेक सर्व चारचाकी कंपन्यांच्या किमतीत वाढ होणार आहे. यामध्ये किया मोटर्सचीही भर पडली आहे. किया मोटर्सने एसयूव्ही सेल्टोजने चारचाकींच्या किमती ३५ हजारापर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. या नव्या किमती १ जानेवारीपासून लागू होणार आहेत.
दक्षिण कोरियाची किया मोटर्स कंपनीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सेल्टोज वाहने देशात लाँच केली होती. या वाहनांच्या किमती ९.६९ लाख रुपयांपासून पुढे आहेत. १ जानेवारीपासून या चारचाकींच्या किमती ९.८९ ते १६.२९ लाख रुपयापर्यंत असणार आहेत.
हेही वाचा-निस्सान जानेवारीपासून ५ टक्क्यांनी वाढविणार वाहनांच्या किमती