बंगळुरू - अनुचित व्यापाराचा आरोप झालेल्या फ्लिपकार्ट व अॅमेझॉनला दिलासा मिळाला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या दिलेल्या चौकशीच्या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
अॅमेझॉन व फ्लिपकार्टची विदेशी चलन हस्तांतरण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ईडीकडून गतवर्षी चौकशी सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी आधी पूर्ण होऊ द्यावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) आणि अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) आठ दिवसात उत्तर देण्याचे कर्नाटक उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.