महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आयएल अँड एफएसच्या आर्थिक संकटाचा सैन्यदलालाही फटका, २१० कोटी अडचणीत ? - Army Group Insurance Fund

एजीएफ हे आयएल अँड एफएसच्या नव्या व्यवस्थापनाशी संपर्कात आहे. एजीएफ हे आशावादी असून सकारात्मक आहे. या विम्यात जवानांपासून जनरलपर्यंत सर्व दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांच्या विम्या हप्त्याप्रमाणे त्यांना लाभ दिला जातो.

प्रतिकात्मक

By

Published : Mar 19, 2019, 8:45 PM IST

नवी दिल्ली - आयएल अँड एफएसने ९० हजार कोटींचे कर्ज थकविल्यानंतर त्याचे फटका बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्राला मोठी झळ बसली आहे. याच आयएल अँड एफएसच्या रोख्यामध्ये आर्मी ग्रुप इन्शुरन्स फंडने (एजीआयएफ) पैसे गुंतविले आहेत. त्यामुळे हे गुंतविण्यात आलेले २१० कोटी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तम वित्तीय विश्लेषकांकडून सल्ला मिळाल्यानेच ही गुंतवणूक केली होती, असे सैन्यदलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल मोहित वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

आयजीआयएफचा २००० पासून शून्य एनपीए आहे. पतमानांकन संस्थांनी आयएल अँड एफएसला एएए हे सर्वोत्कृष्टतेचे मानांकन दिले होते. तसेच राज्य व केंद्र सरकारने आयएल अँड एफएसला सहकार्य केले होते. कर्ज थकविल्यानंतर आयएल अँड एफएसचा एएए हा दर्जा ऑगस्ट २०१८ नंतर काढण्यात आला आहे. आयएल अँड एफएसमध्ये विमा कंपन्या, म्युच्युअल फंड आणि एपीएफ आणि पेन्शन फंड तसेच बँकांनाही गुंतवणूक केली आहे. आयएल अँड एफसच्या कर्जसंकटाचा अंदाज मात्र कोणत्याही बँकेला वर्तविण्यात आला नाही.

एजीएफ हे आयएल अँड एफएसच्या नव्या व्यवस्थापनाशी संपर्कात आहे. एजीएफ हे आशावादी असून सकारात्मक आहे. या विम्यात जवानांपासून जनरलपर्यंत सर्व दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांच्या विम्या हप्त्याप्रमाणे त्यांना लाभ दिला जातो. आयजीएफचे व्यवस्थापन हे इन्स्टीट्युटशन्स ऑफ बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आणि इन्व्हेस्टमेंट अॅ़डव्हायजरी कमिटीकडून केले जाते. आयएजीएफकडे पुरेसे भांडवल असल्याने सभासदांशी बांधील आहोत, असे सैन्यदलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details