सेऊल- कोरोना विषाणुमुळे चीनमधील सुट्ट्या भागांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे ह्युदांई कंपनीने कोरियामधील वाहन उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
चीनमधील कोरोनाचा ह्युदांईला फटका; थांबविणार दक्षिण कोरियामधील उत्पादन
आठवडाखेर सर्व उत्पादन थांबविले जाईल, अशी कंपनीने शक्यता व्यक्त केली आहे. ह्युदांईचे जगभरात १३ उत्पादन प्रकल्प आहेत.
आठवडाखेर सर्व उत्पादन थांबविले जाईल, अशी कंपनीने शक्यता व्यक्त केली आहे. ह्युदांईचे जगभरात १३ उत्पादन प्रकल्प आहेत. यामध्ये सात उत्पादन प्रकल्प दक्षिण कोरियामध्ये आहेत. गेल्यावर्षी ह्युदांईच्या एकूण ४.४ दशलक्ष वाहनांची विक्री झाली होती. उत्पादन विस्कळित होवू नये, यासाठी ह्युदांई पर्यायी पुरवठादारांचा शोधत घेत आहे.
कोरोना विषाणुमुळे चीनमध्ये ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जाणारी विमान सेवा अनेक कंपन्यांनी बंद केली आहे. तर अनेक मोठ्या कंपन्यांनी चीनमधील प्रकल्प कोरोना विषाणुमुळे बंद केली आहेत.