महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर इंडियाला केंद्राचा हिरवा कंदील; २०२२ मध्ये सुरू करणार वाहतूक

एअरलाईनच्या योजनेनुसार आगामी चार वर्षांमध्ये सुमारे ७० विमानांद्वारे वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे. एअरबसचे वाणिज्य अधिकारी ख्रिश्चियन शेरेर यांनी मागील आठवड्यात ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी दृष्टीकोन असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची पंतप्रधान मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भेट घेतली होती.

राकेश झुनझुनवाला
राकेश झुनझुनवाला

By

Published : Oct 12, 2021, 4:03 AM IST

नवी दिल्ली- नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या आकाश एअर या विमान कंपनीला भारतामधील वाहतुकीकरता एनओसी दिली आहे. कंपनीने ही माहिती सोमवारी जाहीर केली आहे. आकाश एअरची होल्डिंग कंपनी एएसएनव्ही एव्हिशन प्रा. लि. कंपनीने २०२२ मध्ये उन्हाळ्यात नवीन विमानसेवा सुरू करण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले आहे.

आकाश एअरमध्ये गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी सीईओ विनय दुबे यांची गुंतवणूक आहे. आकाश एअरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर दुबे म्हणाले, की नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एनओसी दिल्याने खूप खुश आहोत. आभारी आहोत. आकाश एअर यशस्वी पद्धतीने चालू करण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणार आहोत. त्यासाठी नियामक प्राधिकरणासमवेत काम सुरू ठेवणार आहोत. आकाश एअरच्या संचालक मंडळात इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष यांचाही समावेश आहे.

हेही वाचा-खाद्यतेल्याच्या साठेबाजीवर केंद्र सरकारकडून निर्बंध; सणासुदीत तेलाचे भाव होतील कमी?

नुकतेच मोदी आणि झुनझुनवाला यांची झाली होती भेट

एअरलाईनच्या योजनेनुसार आगामी चार वर्षांमध्ये सुमारे ७० विमानांद्वारे वाहतूक करण्याचा प्रयत्न आहे. एअरबसचे वाणिज्य अधिकारी ख्रिश्चियन शेरेर यांनी मागील आठवड्यात ही माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी दृष्टीकोन असलेल्या राकेश झुनझुनवाला यांची पंतप्रधान मोदी यांनी ५ ऑक्टोबरला भेट घेतली होती.

हेही वाचा-धक्कादायक : रुममध्ये कोब्रासोडून केली पत्नीची हत्या

भेटीबाबत झुनझुनवाला यांनी माहिती देण्यास दिला होता नकार-

भेटीनंतर मोदी यांनी ट्विट करत म्हटले, की अनोखे राकेश झुनझुनवाला यांना भेटून आनंद झाला. जिवंत, व्यावहारिक आणि भारताबाबत ते खूप आशावादी आहेत. पंतप्रधान यांच्यासमवेत झालेल्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत आठ ऑक्टोबरमधील एका कार्यक्रमात राकेश झुनझुनवाला यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी लग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीबरोबर काय बोललो याची माहिती तुम्हाला मी कशी देईन, असे गमतीने म्हटले होते. पंतप्रधानांशी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-आयकर विभागाने कारवाईत 550 कोटींची मालमत्ता जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details