महाराष्ट्र

maharashtra

गुगलचा जिओमध्ये ७.७३ टक्के हिस्सा; रिलायन्सला मिळाले ३३,७३७ कोटी रुपये!

By

Published : Nov 24, 2020, 9:47 PM IST

अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गुगलने भारतीय कंपनीत सर्वाधिक जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. जिओने १३ वित्तीय आणि इतर गुंतवणूकदारांना ३३ टक्के हिस्सा विकून सुमारे १.५२ लाख कोटी रुपये अवघ्या ११ आठवड्यांत मिळविले आहेत.

गुगलची जिओमध्ये गुंतवणूक
गुगलची जिओमध्ये गुंतवणूक

नवी दिल्ली - गुगलची पालक कंपनी असलेल्या अल्फाबेटने रिलायन्स इंडस्ट्रीजला ३३,७३७ कोटी रुपये दिले आहेत. जिओमधील ७.७३ टक्क्यांची गुंतवणुकीसाठी गुगलने रिलायन्सला दिले आहेत. गुगलने फेसबुकपाठोपाठ जिओमध्ये गुंतवणूक केली आहे.

अमेरिकेची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गुगलने भारतीय कंपनीत सर्वाधिक जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. जिओने १३ वित्तीय आणि इतर गुंतवणूकदारांना ३३ टक्के हिस्सा विकून सुमारे १.५२ लाख कोटी रुपये अवघ्या ११ आठवड्यांत मिळविले आहेत. या गुंतवणुकीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला मार्च २०२१ पूर्वीच कर्जमुक्त होणे शक्य झाले आहे.

हेही वाचा-या ४३ अ‌ॅपवर केंद्राकडून बंदी, देशाच्या सुरक्षेला होता धोका

दोन्ही कंपन्यांकडून स्मार्टफोनची होणार निर्मिती-

रिलायन्स जिओला गुगल इंटरनॅशनल कंपनीकडून ३३ हजार ७३७ कोटी रुपये मिळाल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिली आहे. गुगल आणि जिओ या दोन्ही कंपन्या एकत्रितपणे परवडणाऱ्या दरात स्मार्टफोनची निर्मिती करणार आहेत. त्यामध्ये अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिम आणि प्ले स्टोअर असणार आहे.

हेही वाचा-शेअर बाजाराने गाठला सर्वोच्च निर्देशांक; निफ्टीने ओलांडला १३,००० हजारांचा टप्पा

सर्वात कमी वेळेत सर्वाधिक ग्राहक मिळविणारी जिओ कंपनी-

सर्वात कमी वेळेत ४०० दशलक्ष ग्राहक मिळविलेली जिओ ही दूरसंचार कंपनी आहे. जिओ ही ब्रॉडबँड जोडणी, क्लाउड, डाटा अनालिटिक्स आणि कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता क्षेत्रात कार्यरत आहे. गुगलला भारतात डिजीटल सेवांचा विस्तार करायचा आहे. त्यासाठी जिओबरोबरील सौद्याचा गुगलला फायदा होण्याची शक्यता आहे.

जिओच्या नफ्यात तिप्पटीने वाढ-

कोरोना महामारीच्या संकटातही रिलायन्स जिओने सप्टेंबरच्या तिमाहीत तिप्पट नफा मिळविला आहे. रिलायन्सला सप्टेंबरच्या तिमाहीत २ हजार ८४४ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. अबुधाबी इनव्हेस्टमेंट ऑथिरिटी आणि पब्लिक इनव्हेस्टमेंट फंडने फायबर ट्रस्टमध्ये एकूण ७,५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. मागील वर्षात सप्टेंबरच्या तिमाहीत जिओला ९९० कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. तर यंदा सप्टेंबरच्या तिमाहीत २ हजार ८४४ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. तर एकूण महसुलाच्या प्रमाणात ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details