सॅन फ्रान्सिस्को - अब्जाधीश बिल गेट्स हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना संपत्तीत मागे टाकले. बिल गेट्स यांची ११० अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. तर जेफ बेझोस यांची १०८.७ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या जेफ बेझोस यांना ऑक्टोबरमध्ये संपत्तीत टाकले. तिसऱ्या तिमाहीत अॅमेझोनच्या शेअरची घसरण झाल्याने जेफ यांच्या संपत्तीत ७ अब्ज डॉलरची घट झाली आहे.
अमेरिकेतील माध्यमाच्या माहितीनुसार मायक्रोसॉफ्टचे शेअर चालू वर्षात ४८ टक्क्यांनी वधारले आहेत. हे शेअर वधारल्याने कंपनीत हिस्सा असलेल्या बिल गेट्स यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ही आकडेवारी ब्लूमबर्ग बिलियिनर्स इन्डेक्सने जाहीर केली. गेली २४ वर्षे जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांना जेफ बेझोस यांनी २०१८ मध्ये मागे टाकले होते. त्यांची संपत्ती तेव्हा १६० अब्ज डॉलर एवढी होती.