महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सॅमसंग गॅलेक्सी एस-१० लाईट देशात होणार उपलब्ध, जाणून घ्या फीचर्स - सॅमसंग फोन

सॅमसंग गॅलेक्सी एस १० लाईटची देशात ३९,९९९ रुपये किंमत आहे. हा स्मार्टफोन वनप्लसला कट्टर स्पर्धा देईल, असे उद्योगातील सूत्राने सांगितले.

Galaxy S10 Lite
गॅलेक्सी एस१०

By

Published : Jan 11, 2020, 5:10 PM IST

नवी दिल्ली - सॅमसंग गॅलेक्सी एस १० लाईट हा देशात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन २३ जानेवारीपासून फ्लिपकार्टवरून मागविता येणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस १० लाईटची देशात ३९,९९९ रुपये किंमत आहे. हा स्मार्टफोन वन प्लसला टक्कर देईल, असे उद्योगातील सूत्रांनी सांगितले.


हे आहेत फीचर्स-

-गॅलक्सी एस१० लाईटमध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा

- १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड आणि सेन्सर असलेला ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा.

- ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

- यामध्ये ६.७ इंचचा डिसप्ले आणि लवकर चार्ज होणारी ४,५०० एमएएच बॅटरी. तसेच सॅमसंग पेसह विविध अॅप आहेत.

हेही वाचा-एटीएममधून १०० रुपयाऐवजी निघाल्या ५०० रुपयांच्या नोटा, अन्...

सॅमसंगने गॅलक्सी नोट१० लाईट नुकताच लाँच झाला आहे. यामध्ये गॅलेक्सी नोटमध्ये ६.७० इंचचा टचस्क्रीनचा डिसप्ले आहे. त्यामध्ये ६ जीबी रॅम, अँडाईड १० आणि ४,५०० एमएच बॅटरी आहे. नोट १० लाईटमध्ये तीन कॅमेरे आहेत. यामध्ये दोन कॅमेरे १२ मेगापिक्सेलचे आहेत. तर तिसरा कॅमेरामध्ये सेन्सरसहित १२ मेगापिक्सेल आहेत.

हेही वाचा-सोन्याच्या तस्करीत वाढ; 'हे' आहे कारण

ABOUT THE AUTHOR

...view details