महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

वाहन उद्योगाला धक्का! फोर्ड भारतामधील दोन्ही उत्पादन प्रकल्प करणार बंद - फोर्ड कारखाने बंद

गेल्या काही वर्षांपासून फोर्ड कंपनीला भारतीय वाहन उद्योगाच्या बाजारपेठेत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत फोर्डने महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे.

फोर्ड
फोर्ड

By

Published : Sep 9, 2021, 5:39 PM IST

नवी दिल्ली - वाहन उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकेतील वाहन कंपनी फोर्ड मोटर कंपनी भारतामधील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करणार आहे. फोर्ड कंपनी केवळ विदेशामधून वाहने आयात करणार आहे. या वाहनांची कंपनीकडून भारतात विक्री करण्यात येणार आहे.

फोर्ड कंपनीने यापूर्वी तामिळनाडूमधील चेन्नई आणि गुजरातमधील सदानंद प्रकल्पात 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प कंपनीकडून बंद करण्यात येणार आहेत. कंपनीकडून एकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या वाहनांची विक्रीही थांबविण्यात येणार आहे. या वाहनांचे देशातील दोन्ही प्रकल्पांमधून उत्पादन घेण्यात येत होते. यामधून फोर्डची दरवर्षी 6,10,000 इंजिन आणि 4,40,000 वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता होती.

हेही वाचा-मोदींनी घेतली भारताच्या स्टार पॅरालिम्पिक खेळाडूंची भेट

कंपनीकडून औपचारिक घोषणा लवकरच...

यापुढे केवळ मस्टँगसारख्या आयात केलेल्या वाहनांची विक्री करण्यात येणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार फोर्ड कंपनीने पुनर्रचना केली आहे. कंपनी केवळ आयात केलेल्या वाहनांकडे वळाली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा कंपनीकडून लवकरच होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून फोर्ड कंपनीला भारतीय वाहन उद्योगाच्या बाजारपेठेत आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा-सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही - छगन भुजबळ

फोर्ड मोटर, महिंद्रा आणि महिंद्राने संयुक्त प्रकल्प रद्द

यापूर्वी कंपनीकडून जगभरातील 70 हून अधिक बाजारपेठांमध्ये फिगो, एस्पायर आणि एकोस्पोर्ट वाहनांची निर्यात करण्यात आली होती. चालू वर्षात जानेवारीमध्ये फोर्ड मोटर आणि महिंद्रा आणि महिंद्राने संयुक्त प्रकल्प रद्द करणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा-बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावालाचा मृत्यू; 'या' प्रकरणात मुबंई पोलिसांनी केली होती अटक

दरम्यान, फोर्ड इंडियाने २२ हजार ६९० प्रिमीअम एसयूव्ही इंडेव्हर परत घेण्याचा निर्णय 2019 जुलैमध्ये जाहीर केला होता. या वाहनामध्ये असलेल्या एअरबॅग इनफ्लेटरमध्ये दोष आहे की नाही, याची कंपनीने तपासणी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details