नवी दिल्ली- ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट कंपनीने फोनपे ही स्वतंत्र होणार असल्याची घोषणा केली आहे. डिजीटल देयक व्यवहारात असलेली फोनपेने वॉलमार्टसह इतर गुंतवणुकदारांकडून सुमारे ५,१७२ कोटी रुपयांचे भांडवल उभे केले आहे.
विलग झाल्यानंतरही फोनपेमध्ये फ्लिपकार्टचा सर्वाधिक हिस्सा राहणार आहे. दोन्ही कंपन्यांच्ये व्यवसाय एकमेकांच्या सहकार्याने चालणार आहेत. फोनपेने लक्षणीय प्रगती केली आहे. अशा वेळी फोनपेमध्ये येत्या दोन ते चार वर्षांपर्यंत स्वतंत्र महत्त्वाकांक्षीपणे गुंतवणूक करण्याचे फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने निश्चित केले आहे.
हेही वाचा-फ्लिपकार्ट लखनौमध्ये सुरू करणार ५० हजार स्क्वेअर फुटांचे गोदाम; ५०० जणांना नोकऱ्या
फोनपेचा डिजीटल व्यवहारात आहे मोठा हिस्सा
- फोनपेचे २५० दशलक्षहूनअधिक ग्राहक आहेत.
- दर महिन्याला १०० दशलक्षहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत.
- ऑक्टोबर २०२० मध्ये फोनपेवरून १ अब्ज डिजीटल देयक व्यवहार झाले आहेत.