महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

'फेसबुक पे' अमेरिकेत लाँच; जाणून घ्या, अधिक माहिती - फेसबुक मेसेंजर

फेसबुक पे अॅपने देयक व्यवस्थेसाठी पेपल, स्ट्राईप आणि जगभरातील ऑनलाईन वित्तीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे.

संपादित - फेसबुक पे

By

Published : Nov 13, 2019, 2:16 PM IST

मुंबई - फेसबुकने आज 'फेसबुक पे' देयक प्रणाली अमेरिकेत लाँच केली आहे. याचा फेसबुक, मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून वापर करता येणार आहे. ही माहिती फेसबुक कंपनीचे उपाध्यक्ष देबोराह लिवू यांनी दिली.

फेसबुक पे अॅपने देयक व्यवस्थेसाठी पेपल, स्ट्राईप आणि जगभरातील ऑनलाईन वित्तीय व्यवहार करणाऱ्या कंपन्यांबरोबर भागीदारी केली आहे. तर कॅलिब्रा हे डिजीटल वॉलेट स्वतंत्रपणे विकसित करण्यात येणार आहे. त्याचा वापर लिब्रा या क्रिप्टोचलनासाठी करण्यात येणार असल्याचे लिवू यांनी सांगितले.

संपादित - फेसबुक पे

हेही वाचा-काही ई-कॉमर्स कंपन्या बाजार प्रभावित करणाऱ्या किमती निश्चित करतात- पियूष गोयल

फेसबुक अॅपने काय करता येणार?
'फेसबुक पे' मध्ये इतर देयक अॅपप्रमाणे आर्थिक व्यवहार करता येणार आहे. यामध्ये मागील व्यवहार, देयक देण्याचे नियोजन आणि इतर सेटिंग्ज बदलता येतात. तर ऑनलाईन चॅटद्वारे ग्राहक सेवा देण्यात येते. 'फेसबुक पे' अॅप अमेरिकेमधील वापरकर्त्यांच्या मेसेंजरमध्ये या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. या अॅपच्या मदतीने गेम, तिकिट आणि इतर खरेदी करता येणार आहे. त्यानंतर भविष्यात इतर ठिकाणी तसेच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपमध्ये फेसबुक अॅप सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details